झोपडी
झोपडी ===================== झोपडी आज काल दिसेनासी झाली, शहरात तर सोडाच.... ; आता ती खेडेगावात ही दुर्मिळ झाली, झोपडीचे सुख आता एक काहाणीच. धो, धो, पावसात झोपडी थोडी कुठे, टापकायची, मग आई आम्हा सर्व बहीण भावडांना, आपल्या पदराच्या आत ओढायची. आता ती माया, विटा, क्राॅकरीट मध्ये कुठे, शोधूनही नाही सापडायची, झोपडी गेली, सुख गेले, एकत्रित बसण्याचा आनंद गेला. आता डायनिंग टेबल, खुर्ची, च्या सवयीने खाली बसता येईना, आनंद तर सोडाच...., जगातील निम्या लोकांना , बसता उठता येईना, झोपडीचे सुख आता शोधूनही कुठेच मिळेना झोपडीचे सुख आता शोधूनही कुठेच मीळेन.
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
