घर
घर गंध मातीचा जिथं दरवळतो अंगणी वृंदावन साज तिथं लिंपलेले ते माझे मातीचे घर विठ्ठल रखुमाईच वास जिथ भोळे बाबडे प्रेमळ मनाचे नाती आणि मातीला जपणारे माणसे तिथे जिव्हाळ्याचे लिंपलेले ते माझे मातीचे घर सजले हे देव देव्हाऱ्यात आपलेपणाची जाणीव जिथं देव तिथल्या माणसात सारवलेला गंध ज्या घरात हात नाती निभावणारे जिथे रमे हे मन त्या आपुलकीने चुलीच्या भाकरीची चव तिथं लिंपलेले ते माझे मातीचे घर घट्ट उखळ - जात्याच नात जिथं कांदा नि भाकरी गोड लागे तिथं तिखट गोड मायेचं ते नंदनवन लिंपलेले ते माझे मातीचे घर
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
