कशाला...
शरीराला आता सजवू कशाला चेहरा तरी मी लपवू कशाला... फसवले जरी सा-या जगाने मला स्वतःला तरी मी फसवू कशाला... हसवले जरी किती मनास माझ्या दु:ख पदरातले वाटू तरी कशाला... शब्द फुले तुझ्यासाठी सजवली मी ओळीत त्यांना मी मढवू कशाला... हरवले जरी माझ्या कवितेचं पान पुन्हा त्याच भावना गिरवू कशाला... नको ना आता ती भुलं इशा-याची निखा-यास मिठी मारू तरी कशाला... काळोखात सोडून दिला हात सोबतीचा उजेडातली सावली माझी म्हणून कशाला... मावळतीचा सुर्य क्षितिजावर निघून गेला सांजवेळच्या थंड हवेत फिरू तरी कशाला... नात्याची माझ्या चोरी भर दुपारीच झाली वेदनेचा हुंदका मनात कोंडू तरी कशाला... ©®निरागस...(गणेश पांढरे)
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
