खुट
खुट ========================== खुट खैराचा निबरडकच बरा, वेसनीला बांधलेल्या गुरला आवरुन... सावरुन ठेवणारा....!, खसखस खोलवर मातीत रुजलेला. दणकट व राकट मोगरीचे दोन आगाव, दानके सहन करुन..., जमीनीत खोलवर जाऊन, स्थिर झालेला. जनावराच्या हीसक्या हासक्याला, न, जुमाणता....., त्याला बांधून ठेवणारा, दमदारच असावा. आगोदरच वळंब्याने अर्धा खाऊन, कसाबसा नरम जमिनीत खुपसलेल्या, खुटा पेक्षा.. !. जनावराला गच्च बांधल्यावर, त्याला आवरुन धरणारा....., काळपट वानचा......., पण भरोशाचा!, खुट कधीही खैराचाच जमीनीत ठोकावा, खुट कधीही खैराचाच जमीनीत ठोकावा. ==========================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
