मन — एकटेपणाचा सखा
मन — एकटेपणाचा सखा जेव्हा उरलेलं नसतं कोणीही जवळ, तेव्हा हळूच हात धरतं एकच अस्तित्व — मन. शांततेत मिसळलेली त्याची कुजबुज, झालेलं सगळं आठवणीतून पुन्हा जिवंत करतं. रात्र झोपलेली असते, मेंदूही थकलेला, पण मन चालत राहातं... एकटं, निरंतर. कधी हास्याच्या आठवणींत न्हातं, तर कधी अश्रूंच्या किनाऱ्यावर बसून राहतं. कुणीतरी बोललेलं एक वाक्य, कुणीतरी न सांगता निघून गेलेलं प्रेम, कुणीतरी विसरलेली आपली ओळख — सगळं पुन्हा पुन्हा जगवतं हे मन. मेंदू विसावतो, शरीर थांबतं, पण मन? ते दररोज एक नवीन प्रवास करतं. कधी मागे... कधी फार पुढे. कधी स्वतःलाही न समजणारं! जन्माआधीही कुठेतरी असतं हे, मृत्यूनंतरही उरतो त्याचा श्वास, आपल्या अस्तित्वाला समजून घेणारं, आपलं मन — एक न बोलणारा सखास. सगळे आपल्याला बदलतात, विसरतात, पण मन मात्र… जसं आपण आहोत, तसंच आपल्याला स्वीकारतं. शब्दाविना बोलतं, स्पर्शाविना समजतं, आणि विरहातही साथ सोडत नाही. कधी वाटतं — हे मन म्हणजेच आत्मा असेल का? ज्याचं स्पंदन चालू असेपर्यंत आपण खरे जिवंत आहोत. – शब्दवेडा संतोष राऊत
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
