आईच्या आठवणी
आई काय लिहावे त्या आई वरती, शब्द ही अपूर्ण पडतील लिहिताना तुझ्यावरती.. मायेचा होतेस तु झरा, आता साधा दिसत ही नाही तुझा चेहरा. आजारी पडल्यावर तुझं ते रात्र भर उशाला बसून राहणं, अजूनसुद्धा ताप आल्यावर डोळ्यांनी तुझीच वाट बघत राहणं. घरात आल्यावर तुझं ते खुद्कन निखळ हसणं, त्या घराला ही समजल नाही तुझं हे अचानक निघून जाण.. मन थोड जरी उदास असल तरी तुझं ते लगेच विचारणं, उदास होणाऱ्या त्या मनाला खूप जड जात तुझ्याशिवाय जगणं काय लिहावे ग तुझ्यावरती, खरंच शब्द ही अपूर्ण पडतील लिहिताना तुझ्यावरती.....
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
