अकल्पित
अकल्पित ========================== तुझ्या डोळ्याची अकल्पित भाषा आज, काहीतरी वेगळीच, कुठे काही खुपत असल्याची, भावनेला आवरुन काही सुचवण्याची. ओठावर शब्दयेऊन सांगता सांगता, था़ंबल्यागत, चेहऱ्यावर दररोजच्या पेक्षा, वेगळीच परिभाषा. कल्पनेच्या पलीकडे थोडी, अकल्पित अकल्पित, थोडी वेगळीच, चेहऱ्याचे स्मित हरवुन अनअपेक्षीत, सदा दरवळणारी तुझ्या चेहऱ्याची रंगत, आज थोडी वेगळीच, कावरी बावरी, अकल्पित. मला न समजलेली तुझी, मुक भाषा मला काहीतरी सुचवणारी, थोडी थोडी वेगळीच, अबोल परिभाषा, अकल्पित...... , अकल्पित. =========================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
