व्यथा जीवनाची....
उसवलेल्या आभाळाला ठिगळं तरी किती लाऊ उरलं सुरल जगायला उसनं अवसान कुठून घेऊ लेक झाली लग्नाची हात पिवळं करीन म्हणलं आस होती उभ्या पिकावर सपान पावसानं वाहून नेलं कारभारणीच्या डोळ्यातलं पाणी आता बघवत नाही दशा झाली जीवनाची अजून आता सोसवत नाही रोष झाला मेघराजाचा सगळं सगळं पाण्यात गेलं तूच धाव आता विठ्ठला माझ्याच कर्मानं सर्व नेलं.....
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
