दुरावला श्वास....
काळोखाच्या रातीमध्ये गेली आज तुझी कुशी डोळ्यातल्या आसवांची भाषा झाली आज मुकी भेदरले आकाशही चंद्र तारे हताशले जगण्याला जगण्याच माप नाही जाणवले कुशीतली खोल ऊब आज मागतो चंद्रही चांदण्यांच्या नक्षीतही आज जाणवे पोकळी फुलातला सुगंधही आज पायीच गळला कशी द्यावी भेट तुला आज दिवाही तुटला ©®प्रारवाद्या
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
