कवडसा
कवडसा ============================= बंद खोली बंद दारच्या या ईंनडोअर खेळात', प्रकाश हीन खेळाच्या आयुष्यात, थोडीशीच अपेक्षा आहे....., त्या बंद खिडकीच्या फटीतुन, येणाऱ्या तेजोमय कवडशाची. अंग अंगात रोम भरुन परत, लक्ष आहे एका काळोख्या जीवनाला सोडुन, ऊंच ऊंच गगणभेदी......, परत एकदा झेप घेण्याची. काळोखकाला कवटाळन्यापेक्षा, आस आता आहे , कवडशाच्या भरवशावर, मार्ग क्रमणाला निघून, परत एकदा हिमालय गाठण्याला. डावे सोडुन दुर दुर पुर्वदीशाच्या, प्रकाशमय दिशेने......, सपा सप पावले टाकीत........, कृत्य सिद्ध करन्याला. एका कवडशाचाच आधार घेऊन, प्रकाशाची दिशा शोधण्यास, परत एकदा जोरदार......., धडक पुर्वदीशाच्या प्रकाशमय वाटेला, धडक पुर्वदीशाच्या प्रकाशमय वाटेला. ===========================
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
