बाबा
आई म्हणता खुशीत ती घ्यावे बाबा म्हणता आधारस्तंभ ते व्हावे खुशीत आईच्या झोपून घ्यावे बोलून बाबाशि मन मोकळे करावे साय लोणी होऊनि आई बाबा च्या प्रेमात न्हावे बाबा सारखं जगात कोणी नाही वाटे वरुण जरी कठोर आतून मात्र गोड गोड ....... गारया सारखा बाबा आपल्याला वाटतो वरुन रुद्र तो नेहमी असतो कडक स्थितीचा पण माया ही अंतराची करतो विचार कुटुंबाचा करतो खूप कष्ट सावलीत त्याच्या बसतो निवांत निर्धास्त कुटुंब ...... विचार नाही उद्याचा स्वप्ना नाही आपले अबोल राहूनही गोष्टी जाणतो आपल्या मनाच्या वृक्ष होतो बाबा छायेत ठेवतो आम्हाला स्वतः सोसून ऊन वारा ...... उबदार वाटे जिवाला मजबूत त्याच्या छायेत भविष्य घडते आमचे ..... राबतो कुटुंबा साठी चेहर्यावर हास्य ठेवून डोळे उघडून जी प्रेम करते ती आई असते डोळे मीठे पर्यंत जो कष्ट आणि प्रेम करतो तो मात्र बाबा .......
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
