बाबा
बाबा दोन अक्षराचा शब्द हा तरी माझं पूर्ण जग यात समावलं लहान असताना जरी झोपायला आई हवी असायची तरी दिवसाची सुरुवात बाबांचा चेहरा पाहिल्यावरच होत असायची कधी ह्या जीवनाच्या वाटेवर, पडल्यानंतर लगेच धावून येणारी आई असते तरी पडल्यानंतर 'उठायचे कसे' हे शिकवणारे बाबा असतात आजही आठवतो मला शाळेचा पहिला दिवस, जरी आशीर्वाद देणारा होता आईचा हात तरी 'घाबरू नकोस मी आहे ना' म्हणून वर्गापर्यंत पोहोचवणार होता बाबांचा साथ दहावीचा निकाल लागताच जरी आई म्हणाली 'काय पाहिजे ग बाळ'? तरी आधीच पुढचं सर्व शोधून तयार होते ते म्हणजे बाबा कोरोना काळात जरी बाबा घरी नसताना पूर्ण घर सावरणारी आई होती तरी त्या महामरित देखील जीवनाशी झुंजताना 'तुम्ही तुमची काळजी घ्या' म्हणत आम्हाला साहस देणारे बाबा होते लेकराच्या यशाचे आनंदाचे क्षण पाहून जरी आईंचे डोळे पाणवतात तरी गुपचूप डोळ्यात अभिमान घेऊन मागे खुश होणारे बाबा असतात मंदिराच्या कळसाचे सगळे कौतुक करत असतात पण पाया विषयी कोणालाही काही बोलावेसे वाटत नाही दिखावाच्या या दुनियेत ते बोलून सुद्धा दाखवत नाही कमी पडू नये कुटुंबाला आनंद म्हणून कामाला कधी बाबा कधी थकत नाही मदत करून ही सर्वांना बदलात त्यांना काही अपेक्षा नसते बाबांसारखी व्यक्ती जीवनात फक्त एकदाच लाभत असते
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
