!!.. सांजवेळ ..!!
नि:शब्द होते भावना उर दाटून आल्यावर निखळून पडतो अर्थ हुंदका मनात दाटल्यावर !! सांजवेळ मावळून जाते दिवस निघतो क्षितिजावर ओढ घराची लागते दिवे लागणी झाल्यावर !! दुर वाटतो चंद्र सुध्दा जवळ काजवा असल्यावर वाट कुणाची पाहू आता वेदनेत जखम भिजल्यावर !! फुंकर तरी कशी घालू भरवसा नसलेल्या नात्यावर हात हातात घेऊ कसा इच्छा निसटून गेल्यावर !! पुन्हा तिच शोधू का वाट रक्त सांडलेल्या पांदीवर बरी तिच सावली सोबतीची हसत राहते मी दिसल्यावर !! -©® निरागसं...(गणेश पांढरे)
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
