कचरा
कचरा ===================== कचऱ्याचे गुणधर्म पाखडु नका, अखेर तो कचराच........., पावसाळ्याची वाट बघा, प्रवाहात तो वाहुन जाईल. त्यासाठी वेळ खर्ची कशाला, शान बादशाहाची धंदा, भिकमांगन्याचा........, त्यांच्या मागे लागुन, आपले औत पाडु नका. विसरुन जा कचऱ्याला, त्याच टेंशन घेता कशाला, अखेर कचराच तो गल्ली बोळ ते, रानोमाळ पसरलेला, पेटुन जाईल की वणवा. कामावर भर दया, कचरा आपोआपच लागेल बाजुला, अखेर कचराच की तो, त्याचे गुणधर्म पाखता कशाला, त्याचे गुणधर्म पाखडता कशाला. ===================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
