माझं स्वप्न
डोळ्यांत भरले आहे अदृश्य असे स्वप्नं, स्वप्नांना त्या फुटेल कधीतरी पंख. स्वतःच्या अंगावर सजवून ती पंख एक अनपेक्षित झेप घ्यावीशी वाटतीये, डोळ्यांत कोपरा करून बसलीये ती फक्त असं वाटतंय तिथे ती कैद झालीये. जीवनात एक नवा आनंद-उत्साह तयार होणार आहे, जेव्हा स्वप्न अश्रूंप्रमाणे बाहेर पडणार आहेत. स्वप्नाला आज बाहेर यावच लागेल, पूर्ण का नाही होतेय म्हणून माझ्याशी भांडावं लागेल. स्वप्न नेहमी डोळ्यांतच सजवून राहणार आहेत का? नवी किरण घेऊन का नाही त्यांचा राहिलेला साज पूर्ण करताहयेत. प्रश्नाचे उत्तर प्रश्नातच डांबून राहतायेत, स्वप्न अजूनही माझ्या प्रश्नातच अदृश्य दिसतायेत. स्वप्नांना साकार करायला मनाला मनवावचं लागेल, मीही कुणाच्या कमी नाही हे त्यांना दाखवावं लागेल. दोन ओळींचा शब्दय फक्त स्वप्नं मात्र साऱ्या जीवनाचा त्यात दडलाय अभंग.
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
