माझी सावित्रीमाई
सावित्रीमाई तुझ्यामुळे आज स्वाभिमानाने जगतेय मी लेवुन शिक्षणाचा ताज कळीच तोडत होते सगळे तुझ्याच कृपेने फुल मी झाले सुगंध मी देते माझ्या कर्तृत्वाचा तुझ्यापायी मिळाला अधिकार शिक्षणाचा तु उघडली आमच्या साठी शाळा आणि आमच्या आशेचा फुलला मळा आज आम्ही आहोत प्रत्येक क्षेत्रात तु टाकले हे दान आमच्या पाञात प्रत्येक मुलीत आहे आज तुझा भास सावित्रीमाई तुझ्यामुळे आज स्वाभिमानाने जगतेय मी लेवुन शिक्षणाचा ताज
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
