"माझा बाबा"
"माझा बाबा" — शब्दवेडा संतोष राऊत नाही लिहिलं कधी कागदावर, पण तुझ्या स्पर्शातून प्रेम समजलं, तू कधी बोललास नाहीस उघडपणे, पण तुझ्या नजरेत काळजी दिसलं... तू थांबला होतास मागे, मी पुढं जावं म्हणून, तुझ्या पावलांच्या प्रत्येक वळणावर माझं भविष्य घडलं शांतपणे… घराचं दार तू उघडून ठेवत होतास, मी उशिरा आलो तरी वाट बघत होतास, पण तुझ्या डोळ्यांमधलं थकलेपण कधी माझ्या नजरेत आलंच नाही... आईच्या मायेची आठवण होते, पण तुझ्या अबोल मायेचं मोल कधी समजलं नाही, तू 'कधी हरलासच नाहीस' असं मला वाटायचं, पण खरं म्हणजे तू 'माझ्यासाठीच हरत' गेलास… शब्द कमी होते, पण तुझं अस्तित्व मोठं होतं, तू “माझा बाबा” आहेस हेच माझं सर्वात मोठं भाग्य होतं! आज हा फादर डे म्हणतात, मी काही विशेष करायचं ठरवलं नाही, फक्त थोडा वेळ बाजूला बसून “बाबा, तुझ्यासारखं व्हायचंय...” ...हे मनातल्या मनात म्हणतोय. कारण तुझी साथ म्हणजे गारवा, तुझं अस्तित्व म्हणजे आश्वासक छाया, आणि तुझं नाव — ते म्हणजे माझ्या नावामागचं खंबीर कारण…
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
