हे जग
म्हणलं स्वप्न पाहता पाहता थोडं जगून घ्यावं या स्वप्नांच्या गर्दीत स्वतः ला सावरून घ्यावं आजपर्यंत पैश्या मागे धावलो थोडं आराम कराव रोजच्या मऊ गादी पेक्षा भुईवर झोपावं पण साला हे जग काही मनाप्रमाणे जगूच देत नाही स्वतः ला स्वतः चा वेळ घेऊच देत नाही जगावं कसं साधे कपडे घातले तर लोक गरीब समजतात सुटा बुटात राहिलं की मोह समजतात म्हणे गादीवर झोपलं की माणूस महान आणि आई च्या कुशीत शिरलं की मूर्ती लहान मग म्हणलं जगाकडे दुर्लक्ष करावं थोडं स्वतः च्या पद्धतीने जगून घ्यावं कारण हे जग नाही समजण्याच्या लायकीचं त्यापेक्षा स्वतः स्वतः च्या च समोर वाकायचं
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
