निरोप बाप्पाचा 🥺🙏🏻🥺
कालच आलास असे वाटत होते, किती पटकन गेले हे दहा दिवस रे बाप्पा… तू घरी येतोस तेव्हा मनात उत्साह दाटतो, जल्लोष उसळतो, आनंद दरबारी पसरतो। तू थांबतोस तेव्हा तुझी सवय लागते, मन तुझ्यात रमते, आणि आजूबाजूला फक्त आनंदच दिसू लागतो। हे सुखाचे क्षण कधी सरून गेले, कळलंच नाही… आणि बघता बघता वेळ झाली तुझ्या परतीची। मन भरून येते, पण हात थांबतात, तुला निरोप देताना उचललेच जात नाहीत। आजचा दिवस थांबवता यावा, असं वाटत राहतं पुन्हा पुन्हा। दररोजच्या आरतीवेळी जशी धडपड असते, तशीच आज मनाची धडपड असेल— “ही आरती अजून थोडी उशिरा करावी का?” फक्त तुझं दर्शन जपण्यासाठी। काय जादू आहे तुझ्या असण्यात, ते तुलाच ठाऊक, पण तुझी ओढ ही सुटत नाही, वितळत नाही। आज जातोस, पण एक वचन दे— आमचं प्रेम तसंंच राहील, आमची ओढ कधी हरवणार नाही। उद्यापासून आम्ही दिवस मोजायला लागणार, तुझ्या पुढच्या आगमनाची आतुरतेने वाट बघणार। बाप्पा… आज जातोस, पण पुढच्या वर्षी मात्र लवकर येशील हां… सगळ्याच त्या जिव्हाळ्याने, त्या उत्साहाने, त्या आनंदाने…!!!
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
