एक आभाळ मोकळे
एक आभाळ मोकळे म्हणून, नटले सजले... भर दिवसा ही तेव्हा, सखे अंधारून आले.. ढग दाटूनी आले. मनी काहूर माजले. एकाएकी सखी, नेत्र का ओलावले? मनी सतावे चिंता काय असेल ग झाले? वार्तानी युध्दाच्या मन कासावीस झाले. एवढ्यात वार्ता आली... युद्ध जिंकले सख्याने... हर्षाने भरले मन, पंख पाखराचे झाले. सखी बघ मी, जाऊन सख्याला भेटले. एक आभाळ मोकळे , पुन: मला गवसले... एक आभाळ मोकळे
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
