एक होता कोरोना!
जन्म होताच पहिला श्वास, सूक्ष्म जीवांची भरते जत्रा. जीवा-जीवांची घोडदौड, कोण कुणाचा नसतो मित्रा. चाहूल तुझी अशी लागली, दूरचित्रवाणी वरून खडबडून जग जागे झाले, मनात भीती भरून. जिकडे तिकडे कोरोना, नव्हते कुणास उसंत उठता बसता सकलांस, दुरचित्रवाणीच असे पसंत. थाळी घंटा खूप वाजविल्या, पळवल्या मनातल्या भीती जग सारे एकवटले, विरूनी गेल्या सकल भिंती. रस्ते सारे सुन्न जाहले, कोण कुणास नाही आसरा कळून चुकले असून नसते, नुसता सरा पसारा. ना कामधंदा बेकार झाले, जीव वाचविण्या लोंढे निघाले कोरोनाने जग आठवले, कोसो मैल गावी चालून गेले. गांवी वेशीवर लाविली, तारा काट्यांचे कुंपण स्वजीव वाचविण्या, पडली नात्यांची विसरण. लागण लागे कोरोनाची, वाळीत त्यांस टाकती या शक्तीने भल्या भल्यांची, पोरकी केली नाती. आझाद शत्रू असे सूक्ष्म तू, वार केला सर्व दूर महाशक्ती असो वा बलाढ्य, लोळवली तुजं समोर. चढवला आलेख मृतुंचा, करोडो घर उजाडले, ना अंतदर्शन अग्निसुख, मन चार भिंतीत कोंढवले. असे जरी सर्दी खोकला, वाटे वाट कोरोनाची, ताक जरी येती, साद लागे फुंकून पिण्याची. गेला जरी कोरोना, भीती मनी जडलेली खूप काही शिकवण, या जीवाने मिळाली. अदृश्य होता शत्रू जरी, धाक मनी भिडली वाट संसारी शिकवी, पाय ते भुंकुन पडती. (नोव्हेंबर २०२३)
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
