शिक्षकाची पंढरीची वारी
शिक्षकाची पंढरीची वारी – शब्दवेडा संतोष राऊत नसतो टाळ, नसते मृदंग, हातात खडू, मनात संग। शाळेचं दारच त्याची पंढरी, ज्ञानरूपी विठ्ठलात भक्तिभाव भरी। फळ्यावरती शब्द फुलवतो, मनामनात दिवा लावतो। वेदपाठ नसे ओठांवरती, अभंग असतो कृतीमधली। शिक्षण म्हणजे त्याची वारी, शब्द म्हणजेच विठोबा प्यारी। निरंतर चालणारा तो वारकरी, घडवतो माणूस – हीच त्याची खरी पुजारी।
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
