"अजून श्वास चालू आहे..."
"अजून श्वास चालू आहे..." — शब्दवेडा संतोष राऊत सगळं हरवलं असं वाटलं, तेव्हा मी स्वतःला घट्ट धरलं… तू नव्हतीस, पण तुझी आठवण मात्र बाजूला बसली होती, कुठलीच गोष्ट बोलत नव्हती, पण सगळं काही ऐकू येत होतं... डोळ्यांत पाणी होतं, आणि त्यातच माझं प्रतिबिंब शोधत होतो, मी तुटलो होतो, पण त्या तुकड्यांतच माझं खरं अस्तित्व सापडलं... प्रेम गेलं, पण त्याचा सुगंध अजूनही श्वासात आहे, शब्द थांबले, पण त्या शांततेतही एक कविता चालू आहे… मी हरलो नाही — मी फक्त बदललोय, आणि अजूनही जगतोय… थोडा हलका, पण खूप खोल.
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
