जीवनाची वाट
जीवन म्हणजे एक सुंदर गाथा, कधी आनंद तर कधी वेदनेची कथा। भावनांनी भरलेले क्षण हे सारे, सुख-दु:खाचे चालते खेळ सारे l आशेचे दीप उजळते अंधारात, निराशाही येते, थांबते वाटेत। पण जेथे असतो विश्वासाचा आधार, तेथे असतो यशाचा अनमोल साज। सफलता सहज नाही मिळत कोणाला, संघर्षांच्या ज्वाळांत होतो तो उजाळा। प्रत्येक पडझड ही असते शिकवण, उभा राहाण्याची देते नवी शिकवण। जीवन जगावे तर भावना ठेवून, आशा आणि विश्वास घेऊन। तू चालत राहा, नको थांबवू पाऊल, सफलता नक्की गाठेल तुझा हक्काचं शिखर एक दिवस येऊन।
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
