माझी किंमत
मनात माझ्या हजार प्रश्न समजून घेणारी वेळच फक्त नाही केली कधी मी बरोबरी कोणाशी माझी किंमत मी ठरवली होती मनाशी वाऱ्या वादळांच्या संकटांना पेलून इच्छा माझी समुद्र ओलांडण्याची असंख्य खाचा पायाशी पण जिद्द नाही सोडली चालण्याची नाही केली कधी मी संगत वाईट शक्तीची भरून ठेवली होती पोती ठाम आत्मविश्वासाची मी खूप मोठी झालीच नाही कधीही मला जगायचे होते मंदिरातल्या देवाच्या पायाशी आणि जोडायचे होते नाते समईत ठेवणाऱ्या प्रकाशाशी असंख्य मला वाईट बोलणारे पण जोड माझी निर्मळ अंतकरणाशी नाही केली कधी मी बरोबरी कोणाशी माझी किंमत मी ठरवली होती मनाशी........ @पुजा ठोंबरे.....
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
