तु, मी आणि गुलाब
सुंदर नात्याचा रस्ता हा... त्यात होता माझा दृष्टिकोन काटे पाहण्याचा... आणि तुझा दृष्टिकोन त्या रस्त्यातील गुलाब पाहण्याचा.... तू मला म्हणाला "चल जाऊ या,ह्या रस्त्यानी" मी म्हणाली "नको राहतील काटे ठीक ठिकाणी" तू म्हणाला "विश्वास असेल आपल्या मैत्रीवर आणि आत्ता पर्यंतच्या प्रवासावर, तर हाथ दे "... पुडच्या क्षणी माझा विश्वास तुझ्या हातात आणि सुरू केले पाऊल पुढे... पाऊले पुढे पडत आहेत आणि अजून पडतील, पण येवढे कळले, रस्त्यात गुलाब हि आहेत आणि काटे पण... पण तुझ्या सहवासात अनुभव फक्त गुलाबांचा झाला.... पण तुझ्या सहवासात अनुभव फक्त गुलाबांचा झाला....
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
