वाटा...
हिरवा शिवार फुलला पिक हुरड्यात आलं टपोरं कणीस वावरात फिरतो दगड गोफणीत... जोडं बैलांची खिलार हातात धरला नांगर करून मशागत शेतीची बांधावर नजर भावकीची... जोडला आटा सोंदूर मोट मोकळी धाववरं पाणी पाटात खेळतं आता भरलं वाकुरं... बदलून खांदा बैलाचा शिवळ जुंपली जुनीच तरण्याला आला जोर मोठ्याला शहाणपण फार... किती घालू मी काडण्या जातच गायीची वढाळ बांधले मुसके तोंडाला तरी नजर दुस-या बांधावर... करा तुम्ही बांधाच राखाणं नाही कुंपणावर भरवसा आलाच वादळी वारा काटे विस्कटात रानात... मग नाजूक टाचेत रूतेल लपलेला काटा जपुन पाय टाक जरा ब-या नसतात ह्या वाटा... -@ निरागसं...(गणेश पांढरे)
