खरंच खुप मागे आहे मी...!
गोड बोलून आपलं काम करून घ्यायचं, अन् पाठीमागे नाव ठेवायचं, हे जमलंच नाही मला.. माणूसकीपेक्षा पैशाला किंमत आहे अन् आपलं उत्पन्नच आपली किंमत ठरवतं, हे जरा उशीराच समजलं मला... कुणाचं भलं होऊ की न होऊ पण स्वतःचा स्वार्थ साधता आला पाहिजे, हे जमलंच नाही मला... मनापासून प्रेम न करता, फक्त वासनिक राहायचं असतं, हे समजलंच नाही मला... खरं न बोलता, खोट बोलून माणसं जवळ कराची, हे जमलंच नाही मला... आधी स्वतः साठी जमवायचं आणि मग दुसऱ्यांना मदत करायची, हे ही कळलं नाही मला... स्वतः ला मोठं करण्यासाठी, दुसऱ्यांना कमी लेखायचं, हे देखील जमलं नाही मला... "खरंच खुपचं मागे आहे मी"....! विल्यम जाॅन राजगुरू
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
