पुढे जायचं असतं ...
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर अपयश येतंच असतं त्याला मागे सारून पुढे जायचं असतं.... जातील ते सोडून वाईट काळात तुझ्या त्यांच्यासाठी थांबायचं नसतं पुढे जायचं असतं..... येतील रे अडचणी क्षणोक्षणी तुला मनात धैर्य ठेवून पुढे जायचं असतं.... माहित आहे मला त्रास होतोय तुला हाच त्रास सहन करत पुढे जायचं असतं.... वेळ वाईट आहे तुझी जाणीव आहे मला चांगल्या वेळेची वाट पाहत थांबायचं नसतं पुढे जायचं असतं.... - नचिकेत जाधव
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
