आवाजाच माप.......
तुझ्या आवाजाच माप जगाहून ताकदीच आल्या सांजरातीमध्ये श्वास भरे लढण्याच मनातल्या वेदनांना प्रीतस्पर्शी हरवते लपलेल्या काळजाला जगण्यात सजवते तुझ्या काळजाच रूप आवाजात उतरत उष्ण झाल्या धरणीस ओलाव्यात भिजवत तुझ्या आवाजात वसे चंद्रातली शितलता शोकलेल्या जीवाला जी देई खोल निरवता तुझ्या आवाजात रूजे रवीतली तेजधग ज्यात देहकण सारा तेवतोच होत धग तुझ्या आवाजाच माप माझ्या मनात सांडत जाणूनच तुझ रूप भाव त्यातच मांडत ©®प्रारवाद्या
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
