हरवलेले बालपण
हरवलेले बालपण एक बालपण होते जिथे खेळले मी भिंतीआड लपलेले, सवंगडी सापडले सगळे. आता हरवलेले बालपण सापडूनही सापडत नाही...... बिस्किटचा तो तुकडा तुकड्याचे ते हिस्से ५पैसे जिथे भागीदार सगळे. आज तो घासातला घास उरत नाही... रेश ओढली जिथे , तिथे खेळ चालू व्हायचा., संपूर्ण आयुष्य ओढले तरी आज तो खेळ परतला नाही... कपात ठेवलेला तो खोटा चहा पानांची पोळी, आणि कापडाची ती बाहुली आज भविष्याच्या चिंते-पुढं घशाखाली घास उतरत नाही.... खेळ होता भातुकलीचा जिथे संसार होता खोटा., वास्तवाची भातुकली आज मला भावत नाही. वेचत आले आंनद सगळे, आठवणीत मी फक्त शब्द वेचते, क्षण वेचलो असते खरे., पण आता बालपण उरलं नाही.... बालपणात खेळले सुर्यासंगे, जिथे दिवस हवाहवासा, आणि रात्र नको होती, आज एकांतात चंद्रा-शिवाय कुणी सोबत बसत नाही... क्षणांत विसरून जिथे दोन बोटांनी नाती जुळायची आज एक आठवण मना बाहेर पडत नाही... जग बघत आले, खांद्यांवर वडीलांच्या आज पाऊल चालले तर कळले ते हे जग नाही.... बालपणाची सीमा ओलांडली तरुणपण डोळ्यासमोर उभे झाले टिपली आठवण घट्ट-अशी जी सहजा सहजी मिटत नाही... हरवला तो बालपण हरवले ते मित्र जबाबदारी पडली प्रत्येकांच्या खांद्यी चुलबुलीचा आवाज आज कानात गुंजत नाही... हरवलेलं बालपण कधी परत येत नाही.... हरवलेलं बालपण कधी परत येत नाही..... -✍🏻आरती कस्तुरे 🤍
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
