ओंजळ
रित्या ओंजळीत सजला पारिजातकाचा मळा लागला मनाला त्याच्या सुगंधाचा लळा.... रित्या ओंजळीत आहे सर्व समान सुख दु:ख राग द्वेष सर्वांचे मोजुन प्रमाण.... रित्या ओंजळीत मृगजळाचा भास करतो फक्त सुखाची आरास.... नको करू दु:ख कशाचे जरी स्वप्न आज तुटले रित्या ओंजळीत दवबिंदू ही ना साचले.... खचले मन आज जरी अंधार नाही जीवनात काजव्यांचा प्रकाश बहरेल मनात.... रिती न राहते ओंजळ कधी भावनांनी बहरते ती सदा कधी आनंदीत कधी आठवणीत फुलांप्रमाणे बहरेल ती सदा. ©️®️संविधा संध्या विवेक वाळले
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
