चार शब्द तिच्या वर्णनाचे
तुला पाहताच मनी माझ्या भाव भरूनी आला. जसे मेनकेच्या सौंदर्यावर विश्वामित्र मोहित झाला. लावण्य तुझे हे मोगऱ्यावाणी, अती बहारदायक होते . जसे सूर्यास्ताच्या वेळी.आकाशातील शोभा बघण्यालायक होते . डोळ्यातील काजळाच्या तुझ्या मात्र भाव निराळा होता . जणू कुट्ट अंधारात जसा अचानक लख्ख उजाळा प्रकट होता . दिसण्यात तर किती साधा माट, पण बोलणे मात्र हृदयस्पर्शी.. जसे भिंतीविना शहर सुने जणू सोलापुरातील एकमेव बार्शी . काय तुझ्या वर्णनाला शब्द पुरेना झाले . तुझे बोल ऐकून आता कान पण सुने झाले . खरं तुला शब्दात मांडून कविता बनेल का ? पण वर्णनास्पद कादंबरी तुझ्यावर मला जमेल का ? तुझ्या आवाजात खरच सरस्वतीचा स्वर आहे. मी तर भरेन ग , पण तुझ्या सरकारने तो माझ्यावर लावलेला कर आहे . तू माझा पगार बनून कायमची माझ्या खात्यात येशील का ? आयुष्यभर तुझ्यावर हक्काने कविता लिहायला मला वाव देशील का ?
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
