नीशीगंधा
नीशीगंधा ====================== तु खुप लांब गेल्यावरही...., तुझी नीशीगंधा ची कलम, खुपच बहरली, आवार सजलेला, सुगंध नीशीगंधाचा, तुझ्या विना आधुरा. तु परत येशील या आशेवर, नीशीगंधा मी फुलवीला, आज बहरुन भावना तो मणाने फुलून वर आला, तुझ्या विना पण गुमसुस... परत तुझ्या च आठवणीत रमुण गेला. तुझ्या गजऱ्याची शोभा वाढवीन्याला, परत हलकेच तो... वाऱ्याच्या झुळकेने हालला, तुझ्या पर्यंत भावना पोहचवीन्यास परत, वाऱ्या बरोबर तो, समरस झाला. तु परत येशील कधीतरी...., हेच ध्येय ऊरासी बाळगुन, निशीगंधा कडक उन्हाळ्यातही, बहरुन खुप आला... बहरुन खुप आला. =================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
