✨💖आकांक्षा💖✨
होस्टेलच्या किनारी लोकांच्या गर्दीत, गोंधळाच्या शेजारी एकटी मी, शांत, अबोल, ना कोणाशी ओळख, ना कोणाशी बोल…..😟 तेवढ्यात आली ती आकांक्षा नावाची माझ्याचसारखी मनाची, vibes ने जुळलेली साधं हसू तिचं, पण मनाला भिडणारं चेहरा गोड, आणि मन तर अजून सुंदर असणारं....❤️ ना सगळ्यांशी Bond जुळवणारी ना खोटी नाती ओढवणारी जिचं मन ज्या माणसांशी जोडतं त्यांना कधीच न तोडणारी.....😍 आकांक्षा म्हणजे अशी मुलगी रडतानाही हसवणारी, हसतानाही रडवणारी😅 लग्न, नोकरी, परिवाराच्या ताणांनी वेढलेली पण बाहेरून हसतमुख दिसणारी.......🤭 मनात खोल दडवलेलं दुःख डोळ्यांत न बोललेलं वेदनेचं समुद्र आईच्या छायेसाठी हळवी झालेली तरीही हसत जगणारी हीच खरी आकांक्षा...🥺 कधी बोलकी, कधी अबोल कधी प्रेमळ, कधी रागावलेली जशी आहे तशीच सुंदर तिच्या लांबसडक केसांप्रमाणेच आकर्षक मनाला मोहून टाकणारं व्यक्तिमत्त्व.......💝 आणि हो 😄 भांडणात सरसकट जिंकणारी गप्पागोष्टीत धमाल करणारी आणि प्रत्येक गोष्टीत Prize जिंकणारी हीच आपली आकांक्षा😂😁🔥..... ✍️वैशाली साबळे
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
