उगीच
उगीच भरकटून जावं कुठेतरी, उगीच शांत बसून राहावं. उगीच एखाद्याचं कौतुक करावं, आणि हसून त्याच्याकडे पहावं. आळसाने भरून जावं कधीतरी, अगदी लोळतही पडावं. वाऱ्याच्या मंद गार झुळुकेसोबत, ओठांवर स्मितहास्य यावं. वाऱ्यात डोलणाऱ्या रोपांकडे, उगीच कुतूहलाने पहावं. लहान मुलांसोबत लहान व्हावं, आणि गोड गप्पा मारावं. कोवळ्या उन्हात निवांत बसून, शून्यामध्ये विरून जावं. काहीच कारण नसताना कधी कधी, उगीच… फक्त उगीचच करावं.
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
