ऊठ मुली तु सावर
ऊठ मुली तु सावर. ========================== विचार कर आजवर खुप सहन केल आपन, त्या हमरसत्यावरच्या चौकातील, आंबट शौकीनांचे चाळे...., मण चाळीनी चाळनी , झेलून बळी पडलो आजवर. मेंहदी लावायची पुढे म्हणुन तु, नाजुक बनु नकोस, विपरीत बुद्धी, विचलीत नजरेला, भिऊन तु घरी बसु नकोस, ऊठ मुली तु मागे राहु नकोस. शीकुन घे दुनियेची रित, झुकलेल्या लाजीरवान्या नजरेला, ईथे कमी समजुन, कधी रावण बळ जबरीने उचलतो. तर तुझ्या मीत भाषी स्वभावाला पाहुन, तला सरीपाटाच्या डावावर मांडुन, भर सभेत तुझी साडी ओढुन, बाजार भरवल्या जातो. खुप झाल आजवर, आता थोड सावर..., आम्ही आईवडील जीवंत आहे तोवर, ऊठ मुली तु स्वताला सावर. लांडग्यांच्या नजरेला बळी पडन्या आगोदरच....!, त्यांची नजरच फोडण्याच्या, तयारीला लागुन.. तु...., ऊठ मुली तु स्वताला सावर. ऊठ मुली तु स्वताला सावर. ==================== ऊठ मुली तु स्वताला सावर.
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
