!!.. मनाचा कोपरा ..!!
मनाचा कोपरा आज रिता झाला नात्यात गुंफलेले मोर पिस ठेवू कुठे... गुलाबाचे काटे आज फारच टोचले त्या पाकळ्यांना आता स्पर्श करू कुठे... देवताच देवाऱ्यातून कशी निघून गेली फुलांची रास माझी मांडू तरी कुठे... भरून आलं भावनेच गोजिरवाणं आभाळ अलगद छेडणाऱ्या थेंबास पाठवू कुठे... पहाटेच्या कुशीत झोपलेली सकाळ आता दवांचे शिंतोडे मारू तरी कुठे... मनाचे रान झाले आहे सदैव मोकळे बेवारस अवस्थेला निवारा देवू कुठे... ओढ जिव्हाळाची संपली आहे तुझी झोप रातीची काजवा दिसेल कुठे... व्यवहार आपलेपणात होत गेला नेहमी विस्कटलेल्या पायवाटेवर थांबू तरी कुठे... ~©® निरागसं... (गणेश पांढरे)
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
