"सल्ला देणं सोपं असतं....
सल्ला देणं सोपं असतं, दोन ओळींच्या प्रेरणेतून मोठी आशा दाखवणंही सहज शक्य असतं... पण जेव्हा आयुष्यच स्वतःला प्रश्न विचारायला लागतं, तेव्हा उत्तरं द्यायला शब्दही अपुरे वाटतात… ज्ञान असतं, अनुभवही असतो, तरीही वेदनेपुढं सर्व शक्ती निरुपयोगी ठरते… मनातले वादळ बाहेर शांत दिसतं, पण आत मात्र प्रत्येक क्षण जळतो, वितळतो... बोलणं खरंच खूप सोपं असतं, पण जळतं तेव्हा कळतं — की सल्ल्याने नाही, तर फक्त वेळ, समजूत आणि स्वतःचा आधारच सावरू शकतो... शब्दांनी नाही, जखमांशी बोलणाऱ्या नजरेने समजून घ्यावं लागतं… कारण खरं तर — ‘ज्याचं खरंच जळतं, त्यालाच आयुष्याचं ताप कळतं…’"
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
