!!.. शब्दांच्या गर्दीत ..!!
मी शब्दांच्या गर्दीत हरवलो आहे अक्षरांच्या ओळीत गुंतलो आहे हाती घेऊन एक एक पानं नव्याने अर्था सोबत भावनेला वाचत आहे... अंगणात सडा कवितेचा मारत आहे चारोळीला रांगोळीत रंग भरत आहे साहित्यांची सजून पालखी दारात आहे घराला संवेदनेची तोरणमाळ बांधत आहे... फुले शाहू आंबेडकर आज शिकवत आहे सावित्रीबाई यांना घरा घरात शोधत आहे रास शिक्षणांची ज्ञान मंदिरात मांडत आहे तिफण घेऊन हाती पेरणी उद्याची करत आहे... वारी माणसांची आयुष्यात निघत आहे पानाफुलात वरदळ पाखरांची होतं आहे जगण्याच्या व्यवहारात संविधान लढत आहे मराठी मनात फक्त शिवछत्रपती दिसत आहे... -©®निरागसं...(गणेश पांढरे)
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
