निरोप बाप्पाचा 🥺
कालच आलास असं वाटतं, आणि क्षणात गेले हे दहा दिवस रे बाप्पा… तू आलास की घर उजळून जातं, मनात उत्साह उसळतो, आनंद पसरतो। तुझीच सवय लागते काही दिवसात, मन तुझ्यात रमून जातं, आणि आजूबाजूला फक्त आनंद दिसतो। आज मात्र निरोपाची वेळ जवळ आली, मन भारी होतं, हातही थबकतात। आजचा दिवस इथेच थांबावा असं वाटतं पुन्हा पुन्हा… बाप्पा, जाशील आज, पण लक्षात ठेव— आमची ओढ तशीच कायम राहील, आमचं प्रेम कधी कमी होणार नाही। पुढच्या वर्षी परत ये एकदम लवकर, तोच जिव्हाळा, तोच उत्साह, तोच आनंद घेऊन…!
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
