२ वाजून २२ मिनिटांनी
गाठली अचानक केतन आणि हृतीकाने मुंबईसोडून पाचगणी, केतनची प्रत्येक गोष्टींमध्ये तथ्य शोधण्याची वेगळीच कहाणी, तिथे हृतीकाची अवस्था हैराण घरातल्या भयानक हालचाली आणि सियाच्या चिंतानी, नक्की काय घडत असेल हो रोज रात्री २ वाजून २२ मिनिटांनी, दुर्गेशच्या मनी काहूर माजवणाऱ्या वाईच्या भयभीत आठवणी, सोनाच्या डोक्यात चाले भयावह lovebirds च्या अकाल्पनिक आठवणी, प्रत्येकाचे आयुष्यात एक एक पान भरलंच आहे चित्तथरारक अनुभवांनी, नक्की काय घडत असेल हो रोज रात्री २ वाजून २२ मिनिटांनी, काय झेललं असेल नक्की spity वेलीच्या डोंगर रांगानी, काय असेल नक्की Alfredo अंकल ची कहाणी, काय असेल नक्की पाचगणीच्या घराची कहाणी, नक्की काय घडत असेल हो रोज रात्री २ वाजून २२ मिनिटांनी, - पिनाक
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
