तू आणि मी
इतकं सुंदर असूच नये एखाद्यानं, नजर लागायची भीती असते... पाहुनी तुला कळले मला परमेश्वराची कलाकृती किती सुंदर असते.... ... सौंदर्याने तुझ्या.....आज तू.... माझ्या शब्दांना हि निशब्द केलंस, त्याच सौंदर्याला... आज तू तुझ्या रूपाने उदाहरण दिलंस. डोळ्यात तुझ्या रात्रीची निरागस शांतता आहे, हसण्यात तुझ्या एक "विलक्षण" ताकद आहे, मनावर माझ्या तुझ्या प्रेमाची एक गोडसर भुरळ आहे..... चैत्राच्या नवीन पालवी सम बहरणारं आपल शतजन्माच नातं आहे.. क्षितिजा पलीकडच ही नवीन क्षितिज तुझ्या समवेत पाहण बाकी आहे..
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
