लाट सागराची (प्रीतबंधी ठेव)
उरामध्ये दडलय तुझ्या मनाच आकाश माझा स्वभावही आता घेतो तुझाच प्रकाश काजव्याला रवीमध्ये एक करण्याच बळ आपसूक तुझ्यासाठी घेत स्वतः कड कळ तुझ पाऊल पडत अंधाराला हटवत दृष्टीआड लपलेली वाट उजेडी आणत तुझ्या नजरेच गुढ मन शोधू पाहतयं तुला कणाकणामध्ये जागवत गाठतयं तुझी विशाल अस्मिता आज बोलू लागलीय माझ्या मनात सरिता जन्म घेवू लागलीय तुझा भाव सागराची आज ओढ लागलीय सरिताही मनतळ त्यात सांडू लागलीय सागराच्या मिलनाची आस जुळू लागलीय सागराच्या लाटेतली तीही लाट बनलीय ©®प्रारवाद्या
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
