माझं मन फेरफट्यावर चढून जातं
माझं मन फेरफट्यावर चढून जातं माझं मन फेरफट्यावर चढून जातं आणि कुठून कुठे पोहोचून जातं. कधी ते बागेत भटकतं आणि फुलांवर झोके घेतं. फुलांच्या सुगंधाने ते चिंब भिजतं, आणि मातीच्या सवंध गंधाने दरवळतं. भुंग्यांच्या गुणगुणाटात ते हवेत घुमतं, आणि पानांच्या सळसळाटात आनंदित होतं. आकाशातून खाली उतरून पावसाच्या थेंबांमध्ये नदीत वाहून जातं, तर कधी फुलपाखराच्या पंखांमध्ये रंगांमध्ये हरवून जातं. माझं मन फेरफट्यावर चढून जातं आणि कुठून कुठे पोहोचून जातं. — कल्पेश कलाल
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
