सुगी
सुगी ==================== सुगी मध्ये सर्व च हिरव हीरव, जीवला वाटे ऊगीचाच घोर, यंदा काहीतरी मांयदळ होईल, सुगी पाहुन पिक थोड चांगल होईल. मोडीत टाकलेल्या आशा, परकर पोलके, धोतराचे नवीन जोड, जमल्यास दोन मनी मंगळसुत्र, वाटल तर बारकीचबी ऊरकल. एवढया साऱ्या आशा फक्त, हिरवळ पाहुन......., देवा ठेव थोडी कृपादृष्टी, सांभाळ रे बाबा गरीबीचे मण. थोडी त्यांची मेहनत, थोडी तुझी मेहरबानी, ठेव सुखी यंदाच्या सुगीला त्यांचे मण, ठेव सुखी यंदाच्या सुगीला त्यांचे मण. ===========================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
