विश्वास ❤
content  मनोगत आस्वाद विवाद संवाद User account menu पारिभाषिक शब्द येण्याची नोंद नावनोंदणी संपर्क Main navigation Breadcrumb स्वगृह विश्वास - एक दीर्घ कविता विश्वास - एक दीर्घ कविता प्रे. राज मनोर ( शनि, २४|०४|२०१० - दु १२:४७ ) कविता प्रतिभा देवासमोर उभा होतो हताश मी हात जोडून डोळ्यामध्ये पाणी होते मनातून पूर्ण मोडून "देवा!" मी म्हणालो, "काय करू कळत नाही" "प्रश्नाचं उत्तर मिळत नाही" "विश्वास ठेव" देव म्हणाला "देवा, सगळेच रस्ते बंद आहेत आशेचे दिवे मंद आहेत" "विश्वास ठेव" देव म्हणाला "देवा, आज असं वास्तव आहे जिथे आशेचा किरण नाही उद्या काही छान असेल असा आजचा क्षण नाही तर कशावर मी विश्वास ठेवावा जगामध्ये विश्वास आहे याचा तुझ्याकडे काय पुरावा" शांतपणे हसत देव मला म्हणाला "पक्षी उडतो आकाशात, आपले पंख पसरून विश्वास असतो त्याचा, खाली न पडण्यावर" "मातीमध्ये बी पेरतो, रोज त्याला पाणी देतो विश्वास असतो तेव्हा तुझा रोप जन्म घेण्यावर" "बाळ झोपते खुशीत, आईच्या कुशीत विश्वास असतो त्याचा, तिने सांभाळून घेण्यावर" "उद्याचे बेत बनवतो, रात्री डोळे मिटतो, विश्वास असतो तेव्हा तुझा पुन्हा प्रकाश होण्यावर" "आज माझ्या दारी येऊन, आपलं मनातलं दुःख घेऊन, विश्वास आहे तुझा कारण मी हाक ऐकण्यावर" "असाच विश्वास जागव मनात, परिस्थिती बदलते एका क्षणात" "आजची स्थिती अशीच राहील, असं कुठेही लिहिल
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
