माणुसकी हाच धर्म...
माणसा माणसा ऐक तू जाती धर्मात अडकू नकोस आणि माणुसकी हाच धर्म तू कधीही विसरू नको स्त्री आणि पुरुष दोनच आहेत जाती दोघेही आहेत समान आपुलकीची नाती तू तिला कधीही कमजोर समजू नकोस आणि माणुसकी हाच धर्म तू कधीहि विसरू नको महापूरुष कोणाचे ह्याचा विचार तू करू नकोस त्यांना जातीत मात्र अडकवू नकोस त्यांचे कार्य त्यांचे विचार तू विसरू नकोस आणि माणुसकी हाच धर्म तू कधीही विसरू नको प्रत्येकजण लढला येथे इतिहास साक्ष आहे येथे प्रत्येकाच्या रक्ताचा रंग सुद्धा सारखाच आहे आहो कुठली जात आणि कुठला धर्म माझ्या राजानं स्वराज्य घडवलं प्रत्येक मावळ्यांच्या सोबतीनं त्यांनी कधी भेदभाव केला नाही तू हि करू नकोस आणि माणुसकी हाच धर्म तू कधीहि विसरू नको... बुद्धांची शिकवण सांगून गेली साऱ्या विश्वाला शांतीचा मार्ग दावून गेली माणसा माणसा, बुद्ध अजूनही येथे संपलेला नाही आणि तू संपूनही देऊ नकोस आणि माणुसकी हाच धर्म तू कधीही विसरू नको आकाशात भिरभिरणाऱ्या पाखरांना जात नाही इथे प्रेमला सुद्धा जात नाही माणसा माणसा चुकलेल्या दोन जीवांना नवी संधी तर देऊन बघ प्रत्येकवेळी दोन जिवांचा सैराट होऊ दे नकोस आणि माणुसकी हाच धर्म तू कधीही विसरू नको माणसा माणसा, जप तू नाती विश्वासाची जप तू माणसं आपुलकीची प्रेम,बंधुभाव आणि मित्रता कधीच वाया जात नाही विचार कर विचार कर आणि माणुसकी हा धर्म जपता जपता शेवटी माणूस व्हायला विसरू नकोस.......
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
