अशी सुरुवात आपल्या प्रेमाची...
तुझ्या हातात हात देताना खूप प्रश्न पडले मग तुझ्या डोळ्यात मला माझंच जग दिसले परत वाटलं तू सुखात ठेवशील? मन म्हणाले भरभरून प्रेम देशील हसायला माझ्यावर सगळं जग आहे रे पण डोळे पुसणारा तू होशील? तुझा हात घट्ट पकडल्यावर विसरले मी ओळख स्वतःची आता फक्त दूरपर्यंत देऊ साथ एकमेकांची दिवस किती माहिती नाही पण प्रत्येक क्षणाला तू माझ्यासोबत असण्याची अशी सुरुवात आपल्या प्रेमाची.......
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
