!! सुर मनातले स्वर मनातले !!
मी व्यवस्थित रचिल्या मिनारी पण, दुर्दैवाने... ती माझा किनारा होती! अडकलो जरी जाळ्यात तिच्या, ती माझ्या इमारतीचा पहारा होती. धुंद लाटा.... वादळ वाटा.... रोजचे खेळ पहायचो! कधी अंगलट-तर कधी दुरावा, मी मात्रं स्तब्ध उभा रहायचो. मग का ऐनवेळी इतकी जोमात आली, सामावून मला तिच्यात पुन्हा वाहून गेली.
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
